तुळजापूर , दि . २६ : उमाजी गायकवाड

तुळजापूर शहराच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या तुळजापूर रत्नांच्या कर्तत्वाचा  सन्मान सोहळा शहरवासीयांच्या  वतीने आयोजित “तुळजापूर रत्न सन्मान कर्तृत्वाचा” हा कार्यक्रम गुरुवारी  लोहिया मंगल कार्यालयात   उत्साहात पार पडला. 


या कार्यक्रमामध्ये अष्‍टपैलू क्रिकेटपटू  राजवर्धन सुहास हंगरगेकर, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत महाराष्ट्रामध्ये 17 वा रँक प्राप्त प्रथमेश प्रदीप हंगरगेकर, सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेले सुरज सुधीर जाधव या तुळजापूरातील तीन रत्नांचा सत्कार  तहसीलदार सौदागर तांदळे,पोलीस उपअधीक्षक डॉ सई भोरे पाटील  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ  देऊन करण्यात आला 


तसेच रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत गिड्डे, ब्रह्मकुमारी संचालिका उस्मानाबाद,सेवानिवृत्त प्राध्यापक घाडगे व पत्रकार उमाजी गायकवाड,महाडीक सर यांच्या वतीने या सर्व गुण रत्नांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी  या तीन गुणी रत्नांचे कौतुक करीत ते म्हणाले की, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी परीश्रम, चिकाटी, दीर्घ अभ्यास, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन ही पंचसूत्रे अंगिकारल्यास आपली गुणवत्ता सिद्ध करता येत असल्याचे सांगून दहावी नंतरचा टप्पा तितकाच महत्त्वाचा असून भविष्यातील करिअरची दिशा दहावीच्या वळणानंतर निश्चित तर करिअरलाही अपेक्षे इतका चांगला आकार देणे शक्य असल्याचे सांगितले. अनेकदा दहावीनंतर कुठली शाखा निवडावी, कोणत्या शाखेनंतर कुठली शाखा निवडावी,  कोणत्या शाखेनंतर कुठल्या करिअरच्या संधी उपलब्ध असतात, त्यासाठी सुरुवातीपासून पूर्वतयारी कुठल्या स्वरूपाची करावी, विशिष्ट विद्याशाखेत निभाव लागण्यासाठी स्वतः जवळ कोणते गुण-कौशल्य असायला हवे, करिअरची वाट निवडताना स्वतः चा कल व धोके कसे ओळखावे आदी प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले.  पालकांनीही विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करुन तुळजापूरला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन    या तुळजापूरच्या रत्नांनी प्रशासकीय सेवेचा फायदा तुळजापूर वासियांसाठी व सर्व सामान्यांसाठी करावा असे आवाहन करुन तुळजापूरकरांनीही आता सध्याच्या ह्या जागतिक महामारीच्या कोरोना संकटाच्या काळात जसे पुजारी मंडळींवर आर्थिक संकट ओढवले होते. त्याअनुषंगाने आता आपल्या पाल्ल्यासाठी करिअरच्या  दुसऱ्या संधी शोधण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच नियोजन समितीने असा उल्लेखनीय कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन यापुढे अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले.
   

पोलीस सेवेत येण्यासाठी धिप्पाड व कनखर असण्यापेक्षा बुध्दीमान असण्याची गरज असून सध्या प्रशासकीय सेवेत येण्याची स्पर्धा वाढत आहे. यास्पर्धेत यश मिळविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून तयारी केली तरी निश्चितच यश मिळविता येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा महामार्ग आहे. महिलांनी स्पर्धा परिक्षा देऊन पोलीस सेवेत यावे.


डॉ. सौ.मई भोरे पाटील 
पोलीस उपअधीक्षक, तुळजापूर


    या कार्यक्रमाप्रसंगी तुळजापूर शहराचे नगराध्यक्ष मा श्री सचिन भैया  रोचकरी, नगरसेवक अमर (भैया) मगर,पंडितराव जगदाळे, विजय कंदले, गुणरत्नांचे पालक अनिता हंगरगेकर, मनिषा हंगरगेकर, प्रदीप हंगरगेकर, सुधीर जाधव, रोहिणी जाधव,प्रा. राजेंद्र घाडगे तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.श्री रमेश ननवरे सर व सूत्रसंचालन प्रा.डॉ आनंद मुळे  यांनी केले व धनंजय पाटील  यांनी आभार मानले.
 
Top