वागदरी , दि. २१ : एस.के.गायकवाड


बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ फेब्रुवारी २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील अनुक्रमे उमरगा (चिवरी) व शिरगापूर येथे तेरणा जनसेवा केंद्र उस्मानाबाद व तेरणा स्पेशालिटी हाँस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुळ नवी मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


 रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ फेब्रुवारी रोजी उमरगा (चिवरी ) येथे तर दि.२४ फेब्रुवारी रोजी शिरगापूर (ता.तुळजापूर) येथे सकाळी ठिक १० वाजता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात ह्रदयरोग,कान नाक घसा, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग,आस्थीरोग,पोटाचे विकार आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. तरी उमरगा (चिवरी) ,शिरगापूर व परिसरातील जनतेनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
Top