उस्मानाबाद , दि . ०९
2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी 22 कोटी 99 लाख रुपयांची तरतूद केल्याचे सभागृहात अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर यांनी सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक अर्थसंकल्प मांडला. उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय साळुंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी प्रास्ताविक केले. अर्थसंकल्पामध्ये बांधकाम विभाग 5 कोटी 73 लाख 84 हजार, निवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी 20 लाख रुपये, शिक्षण विभागाकरिता 2 कोटी 10 लाख,65 हजार, आरोग्य विभाग 1 कोटी,27 लाख,22 हजार 117, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 3 कोटी,30 लाख 1 हजार, अनुसूचित जाती व जमाती इतर दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता 45 लाख 56 हजार, सामाजिक सुरक्षा व दिव्यांगाच्या कल्याणाकरिता 54 लाख 1 हजार, महिला व बालकल्याण विभाग करिता 1 कोटी,31 लाख,22 हजार, कृषी विभाग 1 कोटी 87 लाख 36 हजार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग 92 लाख 7 हजार, वनीकरण विभाग 1 लाख, पंचायत राज विभागाकरिता 3 कोटी 33 लाख 5 हजार 884, लहान पाटबंधारे विभागाकरिता 1 कोटी 42 लाख आणि मार्ग भूल याकरिता 51 लाख रुपये यांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान अर्थसंकल्पीय तरतूद सादरीकरणानंतर झालेल्या चर्चेमध्ये सभागृहातील सदस्य नेताजी पाटील,सक्षणा महेंद्र धुरगुडे यांच्यासह काही सदस्यांनी आपल्या सुचना मांडल्या.