नळदुर्ग ,दि . ०९

 तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या "एसबीआय ग्रामसेवा" कार्यक्रमांतर्गत महिलांना भरतकाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.  


त्याचा मुख्य हेतू गावातील महिलांना भरतकाम कौशल्य विकसित करून त्यांना दैनंदिन  उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती करणे हा होता.  यावेळी महिलांना रंजना राठोड यांनी प्रशिक्षण दिले.
     

या वेळी रामतीर्थ गावचे सरपंच बालाजी राठोड, येडोळा गावचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच लक्ष्मीताई जाधव, दिलासाचे प्रकल्प समन्वयक विलास राठोड, गुरुदेव राठोड,  भूषण पवार, श्रीमंत राठोड, रामतीर्थ गावच्या निर्मला राठोड, कांताबाई राठोड, पूजा राठोड, अनिता राठोड, पारूबाई चव्हाण, भजनाबाई राठोड, भिमाबाई चव्हाण, लीलावती चव्हाण, अमिता चव्हाण, येडोळा येथील घमाबाई पवार, मीनाक्षी राठोड, अंजली राठोड, पुनम पवार, कोमल चव्हाण, ललिता पवार, स्वाती पवार, तसेच गावातील महिलांनी शिबिरात उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
 
Top