तुळजापूर दि २४ 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्याकडून मौजे बारूळ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये कृषिपूरक शासकीय योजनांची माहिती या विषयावर कृषी अधिकारी संजय जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले याला विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ बाबुराव वट्टे, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर ठोंबरे, एस एस जगदाळे, राहुल मते,  कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे डॉ.अनिल पाटील, यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी संजय जाधव यांनी शासनाच्या योजना व त्यासाठी ऑनलाइन कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .महाविद्यालयाचे डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.
 
Top