नळदुर्ग , दि . २५


तुळजापूर तालुक्यातील येडोळा (लमाण तांडा) येथिल  जिल्हा  परिषद प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांनी  स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला. 

यावेळी  इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना  निरोप देण्यात  आला.   स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याधिपिका रेखा दुधाजी जाधव हिने शालेय कामकाजावर सुरेख आशा पद्धतीने नियंत्रण ठेऊन कामकाज पाहिले. तसेच 4थी मधील विद्यार्थ्यांनी   गुरुजी म्हणून कामकाज पाहिले. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी  मनोगत व्यक्त करताना इयत्ता  दुसरी मधील रोहित सुनील पवार या विद्यार्थ्यांने उत्तम सादरीकरणातून मनोगत व्यक्त केले. या शाळेत शेख इमामोद्दीन मैनुद्दीन प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तर पवार साहेब शिवाजी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
Top