नळदुर्ग , दि . २५ : विलास येडगे

नळदुर्ग येथे शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेस स्पर्धकांचा व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 


या स्पर्धेत उस्मानाबाद,  बीड, लातुर, सोलापुर, पुणे या  जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
      


 दि.२३ मार्च रोजी शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने नळदुर्ग येथील भवानी चौकात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लावणी गट, वैयक्तीक गट व युगल नृत्य या तीन प्रकारात घेण्यात आली.या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक शहेबाज काझी,नितीन कासार, बसवराज धरणे,  कमलाकर चव्हाण,माजी नगरसेवक सुधीर हजारे, शरद बागल आदीजण उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचा शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
      

यावेळी  अशोक जगदाळे , नगरसेवक शहेबाज काझी व कमलाकर चव्हाण यांचेही भाषणे झाली. या नृत्य स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रा. संतोष पवार यांनी  बहारदार आवाजात केले. या स्पर्धेतील लावणी गटात प्रथम क्रमांक म्हसवड--सातारा येथील सानिका भागवत हिने तर द्वितीय क्रमांक पुणे येथील शिफा पुणेकर, तर तृतीय क्रमांक उमरगा येथील अंकिता माने हिने पटकाविले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक बीड येथील अनामिका अहिरे हिने पटकाविला.
    

 वैयक्तीक गट या प्रकारात प्रथम क्रमांक लातुर येथील दिनेश जाधव याने पटकाविला तर द्वितीय क्रमांक वैष्णवी भट तुळजापुर हिने तर तृतीय क्रमांक इब्राहिम शेख लातुर यांनी पटकावला. या प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक शुभम बोराडे यांनी मिळविले.
       

युगल नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक गणेश देशमुख/इब्राहिम शेख लातुर या जोडीने पटकावला तर द्वितीय क्रमांक स्वप्नील कांबळे/दिनेश जाधव लातुर या जोडीने तर तृतीय क्रमांक गणेश पवार/इब्राहिम शेख या जोडीने पटकाविला.  युगल नृत्य स्पर्धेत लातुरच्या स्पर्धकांचाच बोलबाला राहिला.स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह सन्मान चिन्ह देऊन शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने गौरविण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन शेटगार, उपाध्यक्ष आकाश धरणे, राहुल जाधव, कोषाध्यक्ष नवल जाधव यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
 
Top