तुळजापूर, दि. २४ 

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये लोकसहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये लोकांचा विकासामध्ये सहभाग असतो, अशी गावे निश्चित प्रगतिपथावर असतात, असे प्रतिपादन समाजसेवक गणेश चादरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये बारूळ ता.तुळजापूर येथे केले.


यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्याकडून मौजे बारूळ येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये ग्रामीण विकास आणि युवकांची जबाबदारी याविषयावर समाजसेवक गणेश चादरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. बारूळ ग्रामस्थ,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ बाबुराव वट्टे, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते नबीलाल शेख, माजी सरपंच शहाजी सुपनार, यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे डॉ.अनिल पाटील, यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागाचा विकासामध्ये वेगवेगळ्या योजनांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावातील युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सहविचाराने आणि लोकसहभागाने गावाचा कायापालट होऊ शकतो असा विश्वास याप्रसंगी आपल्या व्याख्यानांमध्ये  गणेश चादरे यांनी व्यक्त केला. 

महाविद्यालयाचे डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला.
 
Top