नळदुर्ग ,दि .२४ :
शालेय जीवनामध्ये समाज व शिक्षकांकडून मिळणारे संस्कार आपल्याला दिलेली ज्ञानाची शिदोरी हीच आपल्यामध्ये जगण्याचे सामर्थ्य निर्माण करणारी असते, यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे.जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यानी केले
नळदुर्ग येथिल राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घर प्रकल्पातील धरित्री विद्यालयात गुणवंताचा गौरव करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना पन्नालाल सुराणा म्हणाले की , विद्यार्थ्यांच्या मनात ही भीती असते, शंका,काळजी असते . पण तरी ही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसु देत नाही ,त्याकरिता उंच भरारी घेणे आवश्यक आहे असे ज्येष्ठ विचारवंत भाई पन्नालाला सुराणा यांनी नळदुर्ग येथे आयोजित गुणवंताचा सत्कार प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात 'इतिहासाचे रंग रुप हे आले नगरा ' या स्वागत गीताने करुन मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती संगिता शहा यानी केले.धरित्री विद्यालय व आपले घर मधील माजी विद्यार्थीनी माधुरी मिसाळ श्रीमंत पोलीस उपनिरीक्षकपदी व माजी विद्यार्थी कुमार राम दळवे एम.फील.,सेटनेट परीक्षेत उज्वल यश संपादन केल्यामुळे तसेच ज्येष्ठ शिक्षक सुनील पुजारी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला प्रमुख कार्यवाहपदी निवड झाल्यामुळे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचावंत पन्नालाल सुराणा तर प्रमुख उपस्थिती अॕड सयाजी शिंदे सचिव ,वसंतराव रामदासी सहसचिव ,मधुकर इंगळे ,श्रीमंत मिसाळ ,आपलं घर प्रकल्पाचे सचिव गुंडू पवार ,विलास वकील व्यवस्थापक ,अनिल धामशेट्टी मुख्याध्यापक ,संगिता शहा मुख्याध्यापिका ,सुनील पुजारी उपस्थित होते.
अॕड सयाजी शिंदे यांनी एक कथा सांगुन विद्यार्थ्यांची मने जिंकले.कोकणे माणिक यांनी माधुरी मिसाळ ,राम दळवी यांच्या जीवनावर एक कविता सादर केली. यावेळी माजी विद्यार्थी व विघार्थीनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलची कृतज्ञता ,गुरुजीचे ऋण व्यक्त करत शाळेने आम्हाला भरभरुन दिले आहे.त्यामुळे आम्ही एवढे मोठे यश संपादन करु शकलो असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारंजे एस.पी.यांनी तर आभार जगताप जी.एम. यांनी मांनले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमास विद्यार्थी ,पालक उपस्थित होते .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.