तुळजापूर, दि . २४ :
येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांच्या वतीने बारूळ ता . तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये उत्तम आरोग्य आणि आहार या विषयावर वैद्यकीय तज्ञ डॉ.एम.ई. सय्यद यांचे व्याख्यान संपन्न झाले.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी सुपनार, सोसायटीचे चेअरमन ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते नबी शेख, कार्यक्रमाधिकारी डॉ.बृहस्पति वाघमारे , डॉ.अनिल पाटील, डॉ.अंबादास बिराजदार, डॉ.श्रीरंग लोखंडे, डॉ.विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, हनुमंत भुजबळ, जनार्दन सरडे, राजकुमार बनसोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यावेळी व्याख्यानामध्ये डॉक्टर सय्यद यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले