कळंब ,दि . १४ :
जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी तालुका कळंब येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय रसाळ हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मनीषा कस्पटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेव खराटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभीरवाडी व नव्यानेच एम. पी .एस सीच्या परीक्षेत निवड झालेल्या ऋतुजा खापे तसेच नव्याने एम पी एस सी च्या परीक्षेत निवड झालेले कनगरा टाकळी चे अभिजीत जगताप पी. एस. आय व थोरात साहेब फार्मासिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा वरील सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शेळके सदस्य प्रशांत सुरवसे, संजय पाटोळे अनिता शेळके आणि शिक्षण तज्ञ सोमनाथ शेळके, सोमनाथ शेळके उपस्थित होते.
डॉक्टर मनीष कस्पटे असे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे सकाळी लवकर उठावे त्यामुळे मन प्रसन्न राहते अभ्यास करत असताना आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे पहाटे प्राणायाम करावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीशा कस्पटे यांनी केले.
दुसरे पाहुने ऋतुजा खापे म्हणाल्या की जीवनामध्ये आई-वडील व शाळा तसेच शाळेतील शिक्षक यांची मला मोलाची साथ लाभली. मी नियमितपणे एम.पी.एस.सीचा पाच ते सात तास अभ्यास केला. आई-वडिलांचे कष्ट पाहून प्रेरणा मिळाली, विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये शिस्त आणि सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे असे त्या म्हणाल्या.
चार वेळा बारावी फेल झालेले अभिजित जगताप नवनियुक्त पी.एस.आय असे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवलं की आपण काहीतरी करून दाखवायचं ठरवल्यानंतर नक्कीच माणूस ध्येयाकडे मार्गक्रमण करतो, मी माझ्या जीवनात शेतात हाती पडेल ते काम केले त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून तुटपुंज्या पगारावर काम केले अनेक अडचणी आल्या पण आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याची जिद्द सोडली नाही, अपयश पचवत मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दिली या परीक्षेत महाराष्ट्रात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. असे नूतन पी .एस.आय अभिजीत जगताप यांनी निरोप समारंभाच्या भाषणात आपला जीवन प्रवास सांगितला.
खराटे सर म्हणाले की शाळेतील विद्यार्थ्यांनी निरोप घ्यायचा यश मिळवण्यासाठी,स्वताला घडवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ध्येय निश्चित केले पाहिजे, जिल्हा परिषद प्रशाला खामसवाडी येथील शिक्षकांनी जिल्हाभरात गुणवत्तेमध्ये खामसवाडी पॅटर्न तयार केला आहे. त्याबद्दल सर्व सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे स्वतःला ओळखल पाहिजे डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे झोपेत स्वप्न पडण्यापेक्षा जागे असताना स्वप्न पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजेत पर्यायांमधून जीवनामध्ये समायोजन साधने पाहिजे, विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वीपणे केली पाहिजे. असे अहवान खराटे सर यांनी केले शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय रसाळ यांनी सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक डॉ. अशोक शिंपले तर आभार प्राथमिक पदवीधर शिक्षिका सुनिता लिंबोरे यांनी मानले, यावेळी इयत्ता दहावीतील स्नेहल शेळके, शिवानी शेळके, आकांशा शेळके, ओमकार बाबर, बालाजी शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रसाद रणदिवे, आदिती चौरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेस उत्कृष्ट प्रकारचा डायस भेट दिला. या कार्यक्रमासाठी अनिल राठोड, शिवाजी कोकाटे, राजेश सोनवलकर, तुकाराम मुळे, विलास भंडारे, नेताजी वाघ, सुधाकर सुरवसे, संजय लोंढे, बाळासाहेब वाघमारे, रामदास मडके, बाळासाहेब देशमाने, नवनाथ नाईक, आसिफ पठाण, सविता जाधव, सुनिता लिंबोरे, सुदर्शनी कदम, जहीराबी शेख यांनी अथक परिश्रम घेतले..
या कार्यक्रमासाठी इयत्ता दहावीचे एकशे दहा विद्यार्थी व नववी चे ऐंशी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तसेच गावातील प्रतिष्ठित व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.