तुळजापूर , दि . १५ : 

तुळजापूर तालुक्यातील  होर्टी  पंचायत समिती गणाचे  उमेदवार  पृथ्वीराज चव्हाण , अंकिता देवळे  या दोघांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कुष्ठधाम उस्मानाबाद याठिकाणी फळ , अन्न , कपडे , औषध,प्रथम उपचार साहित्य,किराणा  साहित्य वाटप करुन  वाढदिवस साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

सध्याच्या या धावपळीच्या युगात अनेक नागरिक हे आपल्या आजारपणामुळे कुटुंबापासून दूर राहत असुन त्यांना आपुलकीची भावना वाटावी. त्यांना आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून या दोघांनी वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून  कुष्ठधाम,उस्मानाबाद येथील रुग्णाना दैनंदिन जीवनात गरजेचे असणारे फळ , अन्न , कपडे , औषध-प्रथम उपचार साहित्य,किराणा वाटुन  साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 


 समाजातील दानशूर व्यक्तीने समोर येऊन  पीडित नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाची मदत करण्याचे आवाहन केले आहे.  यावेळी पृथ्वीराज चव्हाण ,अंकिता देवळे ,मयूर देडे ,योगेश मोरे , सूरज प्रधान ,ज्ञानेश्वरी जाधवर ,मयूर अळणे
आकांक्षा पवार , विजया कानडे , प्रियदर्शनी स्वामी ,पूजा वाघमारे ,अंजली वाघमारे  आदी उपस्थिती होते.
 
Top