काटी , दि . १५ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुकुमार गणपत बनसोडे यांची पोलीस अधीक्षक नीवा जैन व तुळजापूर उपविभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती डॉ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पिंक पथक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या पथकामध्ये 18 वर्षाखालील मुलींची छेडछाड व विनयभंगाच्या महिला विषयक प्रकरणाचा तपास व निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पिंक पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या पथक प्रमुखपदी तामलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राष्ट्रीय खेळाडू, तथा कराटे व कमांडो कोर्स झालेले पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
याविषयी वरिष्ठांचा आदेश येताच त्यांचा तामलवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने फेटा,शाल, श्रीफळ,पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला . याप्रसंगी हवलदार संजय राठोड, शिवाजी शिरसाट,पत्रकार प्रभाकर जाधव,सामाजिक कार्यकर्ते बलभीम जाधव यांच्यासह तामलवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.