काटी , दि . १५ :
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव यावा , या उद्देशाने विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न झाले.
या स्वयंशासन दिनात शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कु.अक्षता खलाटे हिने, उपमुख्याध्यापक म्हणून वैभव खलाटे तर पर्यवेक्षक म्हणून रणजित चव्हाण , स्वयंशासन प्रमुख विश्वजीत चव्हाण यांनी काम पाहिले. तर पायल चव्हाण, गितांजली चव्हाण, प्राजक्ता चव्हाण,साक्षी चव्हाण,सानिका नवगिरे,सरस्वती चव्हाण,मुक्ता सापते,गायञी सांळुके,अश्विनी शिंदे,पल्लवी चव्हाण,भक्ती पांचाळ,सोनाजी चव्हाण,वैभव सुरडे,निरजंन खलाटे,विजय चव्हाण ,महेश चव्हाण यांनी अध्यापन कार्याचा अनुभव घेतला.
निरोप समारंभात आठवीमधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत भावुक विचार मांडून शाळेचे मुख्याध्यापक जेटीथोर शेखू ,सुषमा देशमुख,जेटीथोर अशोक ,भोयटे बलभीम,भालेकर सुखदेव,पाटील गीताश्री,लांडगे द्रोपदी या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.