अणदुर , दि . २२ : 

तुळजापूर तालुक्यातील  अणदुर येथील सन्मित्र बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक संपन्न होऊन संस्थेच्या चेअरमनपदी साहेबराव जीवनराव घुगे तर व्हा. चेअरमनपदी डॉ नागनाथ सिद्रामाप्पा कुंभार, तर सचिव म्हणून बाबुराव श्रीमंत मुळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    


 दि. ३ मार्च रोजी संस्थेच्या ११ संचालकपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती,
गावातील सेवानिवृत्तांनी मिळून या संस्थेची स्थापना करून अत्यंत काटकसरीने या संस्थेची कार्यपद्धती आखुन सलग लाभांश देणारी संस्था असे नामांकन मिळवले होते. त्यानंतर अनेक बाबी समोर ठेवून सर्व जेष्ठ संचालकांनी संस्थेचा कारभार तरुणांच्या हाती देण्याचा निर्णय करून ( दोन संचालकाचा अपवाद वगळता) ही निवड त्यांनी केली. 

त्यानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये  शिवाजीराव घुगे , मोतीराम कांबळे ,शेटे सुरेश रामचंद्र , ज्ञानेश्वर भास्करराव घुगे, प्रशांत (बालाजी) प्रभाकरराव कुलकर्णी, नाटेकर रेवणसिद्ध शंकरराव,श्रीमती स्वामी सुचिता खंडेराव,सौ. बिराजदार सविता सहदेव, यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली होती.
       

दि 22 रोजी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन पदासाठी  साहेबराव घुगे, व्हा, चेअरमन पदासाठी डॉ नागनाथ कुंभार ,तर सचिव पदासाठी बाबुराव मुळे यांच्या नावाची शिफारस संस्थेचे संस्थापक संचालक   चंद्रशेखर आलुरे यांनी जाहीर  केली, त्यास सर्वांनी होकार देताच  सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी  ए व्ही जाधव यांनी  बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले .या निवडीनंतर ज्येष्ठ संचालक शिवाजीराव घुगे यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आलेख समोर ठेवून काही मौलिक सूचनाही यावेळी त्यांनी केल्या,
ज्येष्ठ संचालक चंद्रशेखर आलुरे , धोंडीबा कांबळे ,दिनकरराव कुलकर्णी ,यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी संचालक मंडळाचा यावेळी सत्कार करण्यात आला.


ज्येष्ठ मंडळींनी ज्या पद्धतीने ही संस्था चालवली त्याच पद्धतीने याच रस्त्यावर चालून  संस्थेचा कारभार करणार असल्याचे डॉ, कुंभार आणि घुगे यांनी यावेळी सांगितले. ही सभा यशस्वी होण्यासाठी राम काळे, दत्ता नाटेकर यांनी परिश्रम घेतले तर शेवटी आभार बाबुराव मुळे यांनी  मानले.
 
Top