काटी , दि . २२

 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेवर संचालक पदी निवडून आलेले अनिल सुर्यभान हंगरकर यांचा सत्कार कामोठे पनवेल येथे मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आला.


याप्रसंगी सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा व्यापारी संघांचे(नवी मुंबई) अध्यक्ष बजरंग नाना कदम,खजिनदार भानुदास सपकाळ, काळभोर ट्रान्सपोर्ट चे मनेजिंग डायरेक्टर शिवाजीराव काळभोर,यशपाल हंगरगेकर आदी उपस्थित होते.
 

याच कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने यशपाल यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तुळजापूर तालुका प्रा.शिक्षक सह.पतसंस्थेचे माजी चेअरमन दयानंद जवळगावकर,बापू काळे,पंकज काटकर,अनिल हंगरकर, सोमनाथ जामगावकर, सुनिल फंड, संतोष भालेकर, शंकर राऊत, पांडुरंग जावळे, विठ्ठल निचळ, काटमोरे यांची उपस्थिती होती.
 
Top