तुळजापूर , दि . २२

शहरातील आशिर्वाद हाॅस्पिटलच्या वतीने 
तालुक्यातील आपसिंगा, कात्री, कामठा गावात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ० ते १५ वयोगटातील सुमारे ३३० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी  हाॅस्पिटलच्या वतीने टाॅनिक, जंतू नाशक, कॅलशियमच्या गोळ्या तसेच एनर्जी ड्रिंक्सचे बालकांना मोफत वाटप करण्यात आले. 

  
 शिबिराचा प्रारंभ प्रतिमा पुजनाने करण्यात आला. यावेळी डॉ. अभयसिंह घोलकर व डॉ. रेश्मा घोलकर यांनी रूग्णांची तपासणी केली. यावेळी तिन्ही गावच्या  ग्रामस्थांनी डॉ. अभयसिंह घोलकर व डॉ. रेश्मा घोलकर यांचा सत्कार केला. 

  याप्रसंगी  आपसिंगाचे सरपंच शंकरराव गोरे, उपसरपंच दीपक सोनवणे, डॉ. औदुंबर भाकरे, अमीर शेख, सचिन जाधव, चैतन्य गोरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे, मालोजी भोसले,  तानाजी फुलसुंदर, बापू शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  दुसर् या टप्प्यात तालुक्यातील इटकळ परिसरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा मनोदय डाॅ. घोलकर यांनी यावेळी बोलून दाखवला.


● कोरोना महामारी - बालकांच्या आरोग्यावर परीणाम  


कोरोना महामारीत ग्रामीण भागातील अनेक बालके कुपोषणाचे शिकार झाले आहेत. या बालकांना हिमोग्लोबीन, कॅलशियम ची कमतरता जाणवत आहे. ग्रामीण भागातील बालके दवाखान्यात जाऊ शकत नसल्याने त्यांची जाग्यावर आरोग्य तपासणी करून मोफत टाॅनिक, जंतू नाशक, कॅलशियम च्या गोळ्या आदी औषधे पुरवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डाॅ. घोलकर यांनी केले आहे.
 
Top