मुरुम, ता. उमरगा, दि .२२ :

 श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी विशेष युवा शिबिर कदमापूर येथे  श्रमदानाने सुरवात झाली. 



राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, समाजसेवा करून  गावकऱ्यांच्या मनातही स्थान मिळवावे. गावाच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहन निवासी शिबिराचे उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे यांनी व्यक्त केले. 


या निवासी शिबिराचे उद्घाटन कदमापूर गावाचे सरपंच मारुती मंडले यांनी केले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक मंमाळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश यंपाळे होते. स्वयंसेवकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून शिबिर काळात सामाजिक कार्य करावे, असे आवाहन श्री मंमाळे यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश यंपाळे यांनी मतप्रदर्शन केले.  


याप्रसंगी माजी सरपंच लक्ष्मण मम्माळे, उपसरपंच धनराज बिराजदार, ग्रामविकास अधिकारी पवनकुमार माळी, पोलीस पाटील भास्कर झाकडे,  अशोक मम्माळे, विठ्ठल जमादार, प्रकाश कुंभार,  शंकर सुरवसे, कार्यक्रमाधिकारी डॉ. जी. एन. सोमवंशी, डॉ. पी. एल. सावंत, प्रा. आर एम. सूर्यवंशी, प्रा. डी. व्ही. बोंदर, डॉ. एस. एन. मुछट्टे, डॉ. ए. के. कटके, डॉ. डी. बी. ढोबळे, प्रा. बी. ए. शेळके, कॅप्टन डी. एस. चिट्टमपल्ले, प्रा. माने, डॉ. रेश्मा नितनवरे, प्रा. विद्या पाटील, प्रा. बिना लोकरे, प्रा. ज्योती जोडदापके, प्रा. बकुळ कांबळे, प्रा. वसुंधरा निचत आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जी. एन. सोमवंशी, सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर तर डॉ. सी. डी. करे यांनी आभार मानले.
 
Top