किलज , दि . २२: राम जळकोट
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे रंगपंचमी साजरी करण्यात आली.गेली दोन वर्ष कोरोना संकटामुळे कोणतेच सण उत्सव साजरे करता आले नव्हते. कोरोनाच्या संकटातून थोडीशी उसंत मिळाली असल्याने भारतीय सण उत्सव यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजत आहे,
आजच्या या उत्सवात नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली असल्याचे किलज येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी रितेश निर्मळे, ओंकार सगर, संजय भोसले, आदेश मुळे, ज्ञानेश्वर काटंबे, वैभव तिगाडे, प्रतीक कोळेकर,यांच्यासह अनेकजणांनी
या रंगोत्सवात सहभाग घेतला.