मुरुम, दि. २९ :
मुरुमचे सुपुत्र तथा पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून शहरात प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.१७ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. इच्छूकांनी सदर स्पर्धेत दि.५ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी.
सदर स्पर्धा ३ कि.मी. अ-गट (वय : १२-१५ वर्ष), ब- गट (वय :१६-४५ वर्ष) आणि महिला तर ५ कि.मी. खुला गट असणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किरण गायकवाड, सिद्धांत गायकवाड, प्रशांत मुरूमकर, देवराज संगुळगे, शरणप्पा वाडे, आनंद कांबळे, जिंदावली सन्नाटे, विकी चव्हाण, अतुल सावंत, आशुतोष गायकवाड आदींकडे संपर्क साधून नोंदणी करावी. या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तरी शहर व परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी केले आहे. विजेत्यांना मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिकृत माहिती आयोजकांनी दिली आहे.