अणदूर , दि .२७
ओमसाई क्लिनिक व बसवराज हॉटेल यांच्या वतीने कै. काशीनाथ मुळे यांच्या स्मरणार्थ अणदुर ता .तुळजापूर येथिल बसस्थानक याठिकाणी नागरिकांसाठी थंड पाणी पिण्यासाठी मिळावे याकरिता पाणपोईचे शुभारंभ पत्रकार अजय अणदूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ऐन मार्च मधेच उनाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना जारचे थंडगार पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ शशिकांत तोडकरी व बसवराज मुळे यांचे यावेळी आभार मानण्यात आले, प्रवासी, नागरिक, शाळकरी मुले, महिला यांच्यासाठी ही पाणपोई अतिशय महत्त्वाची ठरणार आहे,
यावेळी अणदूर सोसायटीचे चेअरमन आप्पू शेटे, प्रकाश गोवे, सुभाष कोळी, बसवराज पाटील, अशोक दाजी गळाकाटे,डॉ शशिकांत तोडकरी, सुभाष राठोड, गणेश राठोड, बसवराज मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.