काटी , दि .२७ :
अविराज जगदाळे याचे जेजे हॉस्पिटल मुंबई येथे एम. बी. बी . एस . प्रवेशासाठी पात्र झाल्याच्या प्रित्यर्थ सहशिक्षक विठ्ठल नरवडे व त्यांच्या परिवाराकडून त्यांचा अभिनंदनपर स्वागत सोहळा संपन्न झाला.
नीट परीक्षेत 637 मार्क मिळवून अविराजने देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे .पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे .
विकास जगदाळे यांचे सुपुत्र असलेले अविराज यांनी अथक परिश्रम व चिकाटी या जोरावर हे यश मिळवले . देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून अविराजने इतर विद्यार्थ्यांसमोर ही एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना ही कठीण अशा काळात शाळा व महाविद्यालये बंद असतानाही ऑनलाइन शिक्षण व इतर पर्यायांच्या माध्यमातून नाउमेद न होता , जिद्द व चिकाटी याची सोबत असेल तर कठीण परिस्थितीमध्ये ही यश मिळवता येते हे त्याने दाखवून दिले आहे .त्याच्या या अनुपम यशाबद्दल पिंपळा बुद्रुक येथील नरवडे परिवाराकडून त्याचा अभिनंदनपर शुभेच्छा सोहळा पार पडला .यावेळी विठ्ठल नरवडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून त्याच्या भावी वैद्यकीय जीवनास शुभेच्छा देऊन इतरांनीही परिस्थीती समोर न डगमगता अथक परिश्रमाच्या जोरावर जिद्द व चिकाटी ठेवून यश मिळवावे असे आवाहन केले .
तसेच शाळेबरोबरच पालकांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचे असते हे त्याचे वडील विकास व आई अर्चना जगदाळे यांनी दाखवून दिले आहे. इतर ही पालकांनी पूरक व प्रेरणादायी मार्गदर्शक अशीच पालकांनी भूमिका ठेवावी असे त्यांनी सांगितले .यावेळी श्रीम. ज्ञानेश्वरी शिंदे यांनी प्रेरणा व शुभेच्छामय काव्य प्रस्तुत करून सर्वांना प्रेरणा व शुभेच्छा दिली .यावेळी विकास जगदाळे , ज्ञानेश्वरी शिंदे - नरवडे , अर्चना जगदाळे ,विठ्ठल नरवडे , यशराज जगदाळे , वेदांत नरवडे , श्रीम. रतन जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती .