मुरूम, ता. उमरगा, दि. २८ 


  लोहारा शहरात मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळा रविवारी  दि. २७ रोजी उत्साहात संपन्न झाला. शहरातील अस्लम सय्यद (शेख) यांनी सामाजिक भावना जपत स्वखर्चातून मुस्लिम समाजातील सामुदायिक  विवाह सोहळ्याचे आयोजन केले. 



या सामुदायिक विवाह सोहळा शहरातील सुरेश वाघ यांच्या शाळेच्या प्रांगणात  सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी ९ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, किशोर साठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस मसुद शेख, कादर खान, असद पठाण, तौफिक शेख, इफतेकार पटेल, वकील शेख, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शब्बीर गवंडी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अविनाश माळी, अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक जालिंदर कोकणे,  अमिन सुंबेकर, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडीकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम कोरे, वामन भोरे, प्रा‌. डॉ. महेश मोटे, पत्रकार इकबाल मुल्ला, डॉ. सुभाष हुलपल्ले, बालाजी व्हनाजे,  गिरीश भगत, रफिक पटेल, मुन्ना जाधव, गौस शेख, रौफ बागवान, नगरसेवक आरिफ खानापुरे, प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, काँग्रेस शहराध्यक्ष आयनुददीन सवार, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, लायक कादरी, तौफिक कमाल, अजिज सय्यद, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, साहेबलाल शेख, जाकिर कुरेशी, अश्फाक शेख, यासिन शेख, वजीर मनियार, संतोष फावडे, ओम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 



यावेळी संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास परिसरातील विविध भागातून महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
 
Top