तुळजापूर, दि . २८ : 

समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण हाच प्रमुख मार्ग आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.अभय शहापूरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी केले.



 यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे बारूळ ता .तुळजापूर  येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना डॉ.अभय शहापूरकर यांनी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. सई भोरे पाटील, संस्थेचे सदस्य व अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे,
सिनेट सदस्य डॉ गोविंद काळे, सरपंच सौ शिंधुताई सुपणार,  शहाजी सुपणार,नबीचाचा शेख,बाबुराव ठोबरे ,सुभाष पाटील,राजकुमार वट्टे ,प्रभाकर धनकवडे, मलिकार्जुन ठोबरे,सौ सुमनताई ठोबरे ,भास्कर सगट, संजय ठोबरे,मुख्याध्यापक श्रीहरी लोखंडे,  मुख्याध्यापक मंगेश अंदूरकर , विठ्ठल धनकवडे, समन्वयक सौ. डॉ.शशिकला भालकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी डॉ. अभय शहापूरकर यांनी समाज परिवर्तनामध्ये शिक्षण हेच प्रमुख शस्त्र आहे त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे असे सांगितले.

अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द आणि कष्ट याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आघाडी घ्यावी असे सुचवले. विभागीय पोलीस अधिकारी सौ. सई भोरे पाटील यांनी आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी मदत करण्यासाठी उत्सुक आहोत गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन केले याशिवाय घरगुती छोट्या छोट्या कामांमध्ये विद्यार्थ्यांनी मदत करावी त्यामुळे आत्मविश्वास वाढतो असे सांगितले. शिबिराच्या समन्वयक सौ.डॉ. शशिकला भालकरे यांनी अहवाल वाचन  व प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी प्रास्ताविक केले. बारूळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि इतर सहकाऱ्यांचा शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

शिबिरार्थी विद्यार्थिनी कु श्रद्धा यादव बी कॉम द्वितीय वर्ग हीने अनुभव कथन केले. सूत्रसंचालक डॉ. शिवाजी जेटीथोर   व  आभार कार्यक्रम अधिकारी डॉ .बृहस्पती वाघमारे,यांनी मानले. कार्यक्रम अधिकारी अनिल पाटील डॉ अंबादास बिराजदार,डॉ श्रीरंग लोखंडे,डॉ विलास राठोड, डॉ.मंदार गायकवाड, श्री हनुमंत भुजबळ,जनार्धन सरडे,राजकुमार बनसोडे,शिबिरार्थी विद्यार्थी आणि ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
 
Top