जळकोट, दि.२७ : मेघराज किलजे
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा देऊन , ग्राहकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी बँक सदैव कटीबद्ध राहील. असे आश्वासन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र कुरमुडा यांनी जळकोट येथे व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे येथील मुंबई- हैदराबाद महामार्गावरील जिल्हा परिषद प्रशाला शाळेच्या बाजूला नवीन वास्तुत स्थलांतर झाले आहे . या नव्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र कुरमुडा हे बोलत होते. या नव्या वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन कुरमुडा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, जळकोट शाखा हि दहा शाखामधून एक नंबर ला आहे. येथील शाखेच्या उत्तम सुविधा देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू. महाराष्ट्र ग्रामीण बँक हि स्पर्धेत उतरली असून शेतीपूरक कर्ज व अन्य सुविधेचा लाभ ग्राहकानी घेऊन बँकेच्या विकासास हातभार लावावा. असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुका इंगोले, सरपंच अशोकराव पाटील, जळकोट शाखेचे व्यवस्थापक नामदेव पाटील, लातूर येथील गंजगोलाई शाखेचे शाखा व्यवस्थापक डॉ. दिलीप गाढे,भिवाजी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे, जळकोटवाडीचे सरपंच शिवाजी कदम, होर्टी सरपंच संजय गुंजोटे, लोहगावच्या सरपंच सौ.लोचना दबडे, प्रकाश चौगुले, नारायण पटणे, रमेश सोनटक्के, माजी शाखा व्यवस्थापक शिंदे , बँक अधिकारी सौरभ माळ बोरगावकर, प्रवीण इंगवले आदि सह, खातेदार, ठेवीदार,महिला, शेतकरी , बँकेचे कर्मचारी, वक्रांगी केंद्राचे केंद्रचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.