नळदुर्ग , दि . ०३ : विलास येडगे 


सालाबादप्रमाणे याहीवर्षी  गुरुवार दि.३ मार्च रोजी नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. नळदुर्गचे  सुपुत्र हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांनी निजामाशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे दरवर्षी नळदुर्ग शहरात त्यांचा स्मृतिदिन "हुतात्मा दिन" म्हणुन साजरा केला जातो. याहीवर्षी दि.३ मार्च रोजी नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
     


प्रारंभी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या पुतळ्याचे पुजन राज्याचे माजी मंत्री व बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी, अणदुरचे सरपंच व बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक राम आलुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, नगरसेवक मुश्ताक कुरेशी,तुळजापुर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुभद्र मुळे, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, शिवाजीराव वऱ्हाडे, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले,प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव,उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अझहर जहागिरदार,अमर भाळे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
       

यानंतर शहरांतील मुख्य चावडी चौकात हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे, व्यापारी मंडळाचे खंडेशा कोरे, नगरसेवक बसवराज धरणे, नितीन कासार, महालिंग स्वामी, विनायक अहंकारी व जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय बताले यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
     

यावेळी व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, सतीश पुदाले,भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सरदारसिंग ठाकुर, नेताजी महाबोले, नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शंतनु डुकरे, अप्पू स्वामी, दयानंद स्वामी , अख्तर काझी ,  शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, दादासाहेब बाबसोडे , शिवाजी  गायकवाड, यांच्यासह व्यापारी मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
    

 हुतात्मा स्मारकात नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या हुतात्मादिनाच्या कार्यक्रमात प्रारंभी हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी, नगरसेवक बसवराज धरणे,विनायक अहंकारी, शिवाजीराव वऱ्हाडे, पद्माकर घोडके यांच्या हस्ते हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक बसवराज धरणे, शिवाजीराव वऱ्हाडे व पत्रकार विलास येडगे हे होते.या कार्यक्रमास भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे हेही उपस्थित होते.


    यावेळी बोलतांना नगरसेवक विनायक अहंकारी यांनी म्हटले की आज नळदुर्गवासीयांना हुतात्म्यांचा विसर पडत आहे. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला मोजकेच नागरीक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ज्या हुतात्म्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी निजामाशी लढले. निजामाशी लढता, लढता ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर आजच्या पिढीला पडावा हे योग्य नाही. आजच्या मोबाईलच्या दुनियेत गुरफटत चाललेल्या युवा पिढीला या हुतात्म्यांचा इतिहास कळावा,समजावा यासाठी पुढील वर्षांपासुन नळदुर्ग शहरात युवा पिढीला सोबत घेऊन हुतात्मा दिन मोठ्याप्रमाणात साजरा करावा असे आवाहन यावेळी विनायक अहंकारी यांनी केले आहे. यावेळी तानाजी जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार नगरपालिकेचे कर्मचारी मुनीर शेख यांनी मानले.
     
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी मुनीर शेख, खलील शेख, हरीभाऊ पुंड, शहाजी येडगे, खंडू नागणे यांच्यासह न.प. कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
 
Top