नळदुर्ग , दि . ०३
निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनात निजामाने पोसलेल्या रजाकारांच्या सशस्त्र हल्ल्यात
नळदुर्गचे सुपुत्र हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांनी हौतात्म्य पत्करले.नळदुर्ग शहरात दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा दिन पाळला जातो.
जे देशासाठी लढले त्या हुतात्म्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नळदुर्ग येथील कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात असलेल्या हुतात्मा बाबूराव बोरगांवकर,व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या पूतळ्यास अभिवादन करण्यात आले,
यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.