चिवरी, दि . ०३: राजगुरू साखरे
मागील दिवाळी सणा पासून खाद्यतेलाचे भाव स्थिर होते, मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया - युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे भाव झपाट्याने वाढू लागली आहेत. खाद्य तेलाच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाल्यामुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
त्यामुळे या युध्दाच्या झळा सामान्याना बसत आहेत. भारत देश खाद्य तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे, खाद्य तेलामध्ये सूर्यफूल तेल रशिया - युक्रेन, सोयाबीन तेल अर्जेंटिना ,ब्राझील पामतेल इंडोनेशिया, स्विझरलँड मलेशिया, तर शेंगदाणा तेल महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश ,तामिळनाडू येथून आवक होते .
त्यामुळे खाद्यतेलांच्या दरावर मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सणा पासून तेलाची आवक चांगली होत होती. त्यामुळे खाद्य तेलाचे दरही स्थिर आले होते, मात्र आता रशिया युक्रेन युद्ध सुरू केल्याने युक्रेन वरून येणाऱ्या सूर्यफुलाच्या आवकवर परिणाम झाला. त्यामुळे सोयाबीन व पाम तेलाच्या मागणीत वाढ झाली. त्याचा परिणाम सोयाबीन व पाम तेलाच्या दरामध्येही दिसुन येत आहे. एकंदरीत अस्मानी-सुलतानी संकटामुळे खाद्यतेलासह, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.