तुळजापूर , दि . ०५

   
 सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर  सॉफ्ट टेनिस स्पर्धेत चमकदार कामगीरी करत उप विजेतेपद पटकावणा-या उस्मानाबाद जिल्हा संघातील खेळाडू व प्रशिक्षक संजय नागरे यांचा तहसीलदार सौदागर तांदळे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. 


  
 तालुका क्रिडा संकुल येथील टेनिस कोर्ट वर आयोजित सत्कार सोहळ्याला मंडळ अधिकारी अमर गांधले, नेमचंद शिंदे, अभिजित कदम आदींची उपस्थिती होती. 

    
 महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि सांगली जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सबज्युनियर राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा  दि. २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत तीन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच टीम इव्हेंट मध्ये चमकदार कामगीरी करत उस्मानाबाद जिल्हा संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती.  

   
 यावेळी बोलताना तहसीलदार तांदळे यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूरला समृध्द क्रिडा वारसा असून साॅफ्ट टेनिस स्पर्धेतील खेळाडू मेहनती च्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर विजयी घोडदौड कायम ठेवतील असा विश्वास व्यक्त केला.
 कार्यक्रमाला हेमंत कांबळे, विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी, माजी सैनिक संताजी थिटे, सतीश हुंडेकरी, किरण हंगरगेकर, प्रदिप अमृतराव आदींची उपस्थिती होती. 


 या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला  
यश हुंडेकरी, प्रियांका हंगरगेकर, कृष्णा थिटे,उन्मेष माळी, यश हुंडेकरी, प्रथमेश अमृतराव, समर्थ शिंदे, श्रेयस गायकवाड, हर्षवर्धन गुळवे व प्रशिक्षक संजय नागरे 

 
Top