काटी , दि . ०५ 


तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक अनिल सुर्यभान हंगरकर यांची नुकत्याच उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद अहमद अकबर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून नुतन संचालक अनिल हंगरकर व निवडणुकीच्या दरम्यान मार्गदर्शन करणारे कुशल मार्गदर्शक तथा तुळजापूर शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन दयानंद जवळगावकर यांचा  सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद अहमद अकबर, सहशिक्षक संजय भालेराव,पंकज काटकर,महादेव कोंढारे, लिपिक श्रीकांत पांगे,हणुमंत कदम,राठोड सर,अजित इंगळे ,गुरुप्रसाद भुमकर, श्रीमती.सुरवसे व श्रीमती क्षिरसागर  आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top