कळंब , दि . ०५


 तालुक्यातील हासेगाव (के) येथील जि. प. प्रा. शाळेतील सहशिक्षक समाधान भातलवंडे तसेच जि. प. प्रा. शाळेचे सहशिक्षक दीपक चाळक आणि त्यांच्या पत्नी जि. प. प्रा. शाळा इटकूर येथील सहशिक्षिका अंजली यादव - चाळक यांना कळंब  तालुकास्तरीय "आदर्श शिक्षक" पुरस्कार जाहीर झाल्याने दि.05 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव (के) येथे तिन्ही आदर्श शिक्षकाचा  श्रीफळ आणि पुष्पहार, पुष्प गुच्छ देऊन, फेटा बांधून  शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक, शिक्षिका हासेगाव (के) यांच्यावतीने सत्कार करण्यात आले.  पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिकाजी जाधव, सहशिक्षक अमोल बाभळे, राजाभाऊ गुंजाळ, विकास खारके, सहशिक्षिका लक्ष्मी कोकाटे, प्रतिभा बिडवे, कालिंदा समुद्रे आणि शाळेतील विध्यार्थी उपस्थित होते.
 
Top