तुळजापूर , दि . ५ :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या मराठवाड्यातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये आरळी बुद्रुक येथील कार्यक्रमाचा उल्लेख मागील काही वर्षात होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला दिनाचा हा समारंभ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सन्मानाचा आहे.
तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आरळी बु.महोत्सव समितीच्या वतीने जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा दि. 7 मार्च रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार देऊन महोत्सव समितीच्या वतीने सन्मान केला जातो, यावर्षी महोत्सव समितीच्या वतीने जिल्हास्तरीय 8 व राज्यस्तरीय 3 अशा 11 कर्तृत्ववान महिलांचा हिरकणी पुरस्कार देऊन आरळी बुद्रुक येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष सुनील पारवे यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्यासाठी तहसीलदार सौदागर तांदळे, सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनुर सय्यद,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे,प.स.तुळजापूर माजी सभापती शिवाजी गायकवाड,रोटरी क्लब तुळजापूर अध्यक्ष रामचंद्र गिड्डे,सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,माजी नगरसेवक, सरपंच गोविंद पारवे,उपसरपंच किरण व्हरकट, सरपंच परिषदेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख पत्रकार अनिल आगलावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या महिलांचा होणार गौरव
कु.सोनाली संतोष पवार (राष्ट्रीय खेळाडू भालाफेक),कु..मनीषा वाघमारे - (सामाजिक दातृत्वसेवा),सौ.प्रियंका प्रवीण रणबागुल (आदर्श सरपंच भूम ),सौ.सुलक्षणा मोरे (आरोग्य कर्तव्यसेवा),उमादेवी मगर ( प्रशासकीय कर्तव्यसेवा ) श्रीमती शोभा राऊत (शैक्षणिक कर्तव्यसेवा), सौ. शालन मधुकर पंडित - आगलावे (आदर्श परिवेक्षिका ),श्रीमती नगीना सोमनाथ कांबळे ( संघटनात्मक कार्य), सौ.जयश्री पोळ सदाफुले ( साहित्य व कलाकौशल्य ), श्री मेसवाल (अभिनेत्री,निर्मिती),सौ.कोमल रमेश शिंदे - (सामाजिक सेवा कार्य) आदी.