डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुर्णाकृती पुतळ्याचे छयाचित्र

वागदरी , दि . ०५ : एस.के.गायकवाड

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करणे व त्याठिकाणी असलेल्या अर्धाक्रती पुतळ्याच्या जागी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने रिपाइं (आठवले)सह संबंध  आंबेडकरी आनुयायामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
   

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस आविनाश महातेकर यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली , मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, रिपाइंचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, आल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बाशीद  कुरेशी, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष आप्पा कदम,  तानाजी उमाजी कदम, प्रताप कदम, विठ्ठल जेटीथोर, शुभम कदम ,आदीसह  कार्यकर्ते यांनी सातत्याने लेखी,तोंडी,निवेदने देवून मोर्चे आंदोलने,  उपोषण केले होते.तुळजापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली होती. 
    

या मागणीचा जाणीव पूर्वक विचार करून तुळजापूर विधान सभेचे आमदार राणागजीतसिंह पाटील, व नगराध्यक्ष सचिन  रोचकरी , विनोद  गंगणे यासह सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नामुळे शासनाने तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत सदरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठीच्या कामाला नव्याने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तरी सदर कामाला त्वरीत सुरुवात करण्यात यावी अशी मागणी रिपाइंने केले आहे.
 
Top