तुळजापूर , दि . ०५
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे व टोळ भैरव दरवाजा तात्काळ उघडण्यात यावा सावली त्याचबरोबर भाविकांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नये यासाठी पायरीवर पेंट करण्याची मागणी विजय भोसले यानि श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडे लेखी केली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व्यवसथापक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, श्री तुळजाभवानी मंदिर व परिसरात भाविकांचे उन्हापासून सरंक्षण व्हावे, त्यांच्या पायाला चटके बसू नये, यासाठी नेट जाळीचे मंडप व मंदीरातील पायरीवर पायऱ्या थंड रहाव्या याकरिता पांढरा पेंट लावून घ्यावा, जेणेकरून भाविकांचे पाय उन्हापासून संरक्षण होईल. त्याचबरोबर मंदिरात रांगेत उभे राहून देवी दर्शन घेतलेल्या तहानलेल्या भाविकांना पिण्याचे थंड पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, त्याचबरोबर दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांसाठी टोळ भैरव दरवाजा तातडीने खुला करावा असेही म्हटले आहे.