काटी , दि . ०१
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार रोजी पालक बैठक पार पडली. यात सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या निवड प्रक्रियेतून पार पडलेल्या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश नागनाथ कदम यांची तर उपाध्यक्षपदी सौ.राधिका विलास धनके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नुतन अध्यक्ष गणेश कदम व उपाध्यक्ष श्रीमती राधिका धनके यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक बापू गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बापु गायकवाड, सागर डोंगरे,गणेश कदम, समाधान धनके,बालाजी कदम, सोन्या धनके सहशिक्षक पी.बी. जावळे, बी.एस.मुंढे, जी.एन.चव्हान, एम.पी.पाटील,व्ही.यु.नरवडे, ए.एस.शिंदे, एम.ए.मोरे, ए.आर. निकते यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे नुतन सदस्य,पालक, शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.