इटकळ , दि.१
तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील "संत सदगुरु शिवरामबुवा महाराज" याचे महाशिवरात्री दिवशी शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.या दिवसांपासुन येथील यात्रा भरणारी यात्रा रद्द केली असली तरी दरवर्षी होणारे कार्यक्रम कोरोना प्रतिबंध पाळुन होणार असल्याचे हभप आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांनी सांगितले आहे.
मंगळवार दि . १ मार्च रोजी महाशिवरात्री या दिवशी दिवसभर सदगुरु श्री संत शिवरामबुवा यांचे दर्शन, संध्याकाळी संत शिवरामबुवा व संत नवलिंग महाराज भेट, रात्री दिंडी सोहळा, दि .२ मार्च रोजी फडावर किर्तन सोहळा तर वडाखाली किर्तन,भजन,भाऊड,हरीजागर कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तर ३ मार्च रोजी दिवसभर श्री संत सद्गुरू शिवरामबुवाचे दर्शन,गुरु मावलींच्या काल्याचे किर्तन,व महाप्रसाद आदि कार्यक्रम साध्या पद्धतीने,कोरोनाचे नियमाचे पालन, सामाजिक अंतर राखुन शिस्तीने साध्या पद्धतीने ही यात्रा संपन्न होत आहे.
या यात्रेत मंदिराकडे जाणा-या सर्व रस्त्यांवर बॅरेकेट लावले आहेत.येणा-या भाविकांसाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाविकांनी गर्दी करु नये अशी माहिती दिंडेगाव येथील हभप आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर व नळदुर्ग पोलिस ठाणे अंकित इटकळ दुरक्षेञ पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हरिष तायवडे यांनी सांगितले आहे.