वागदरी, दि . ०१

 अक्कलकोट तालुक्यातील  वागदरी येथे  वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे आराध्य दैवत, बसवशरण साहित्याचे रक्षण करणारे संत कक्कय्या महाराज यांची जयंती वागदरी येथे कक्कय्या समाज मंदिरात समाज बांधवानी मोठ्या उत्साहाने साजरा केले.तत्पूर्वी आराध्य दैवत खंडोबा मूर्ती पूजन जेष्ठ समाज बांधव परमेश्वर मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले.वीर शरण कक्कय्या महाराजांच्या  प्रतिमेचे पूजन, सौ. सिंधुताई सोनकवडे (माजी सरपंच व  जि.प.सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले. 
        

पंचप्पा सोनकवडे म्हणाले ढोर समाज १२ शतकापासून उदयास आला.संत वीर कक्कय्या महाराज यांनी मानवतेची शिकवण दिली.त्याचे विचार आजही समाजाला प्रेरक असल्याचे सांगून त्याच्या विषयी माहिती दिली.
 प्रशांत वागदरीकर युवा समाज बांधव यांनी समाज बांधवाना जयंती च्या शुभेच्छा दिल्या ढोर समाजाचा कातडी कमावणे हा व्यवसाय होता.तंत्रज्ञान युगात हा व्यवसाय संपुष्टात  आला आहे.मात्र समाज बांधवानी आपल्या पूर्वजांच्या व्यवसायाची व इतिहासाची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यक्रमासाठी महाप्रसादाची सोय मल्लिनाथ सोनकवडे,नितिन चौगुले यांनी केले. यावेळी गंगाराम सोनकवडे, सुरेश सोनकवडे,गणपती सोनकवडे,नरसिंग मोहरकर,अमोल कटकधोड,रोहित परमेश्वर सोनकवडे,रोहित आंनद सोनकवडे,भिमशा सोनकवडे,राम दरवेशी,मारुती चौगुले,यलप्पा नारायणकर,नागू नारायणकर गिरीष धडके आंनद सोनकवडे व मंगल वागदरीकर आदीसह  समाज बांधव  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महादेव सोनकवडे यांनी केले.
 
Top