तुळजापूर , दि . ०१

महाराष्ट्र स्टेट कराटे चाॅपियनशिप स्पर्धेचे न्यु कराटे डो असोसिएशन तुळजापूर आयोजक सुधाकर उळेकर यांच्या वतीने लोहिया मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास 400 मुला मुलींनी आपला सहभाग नोंदवला.


उद्घाटन सोहळा प्रसंगी आ.राणाजगजितसिंह पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशिष कोळगे, सुनिल देशमुख, स्नेहा कोकणे, सचिन कोकणे, माजी नगरसेवक अमर मगर, आमदार संवाद मंच समन्वयक आनंद कंदले,अरूणा सारवान, देवकन्या गाडे, टि.व्ही न्युज चॅलेंनचे प्रतिनिधी संतोष जाधव अविनाश गंगणे,आयोजक सुधाकर उळेकर, ज्ञानेश्वर गाडे आदी उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेमध्ये पुणे,सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, नाशिक, वाशिम,अकोला, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धकानी कराटेचे सादरीकरण केले.

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम पुणे,द्वितीय सोलापूर तर तृतीय लातूर संघ विजेतेपद मिळवत ट्रॉफी अन बक्षिसे प्राप्त केले तर उपस्थित सर्व संघांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धा पंच म्हणून सुनील देशमुख वाशिम, सचिन कोकणे नाशिक, सचिन पाटील कोल्हापूर, महेश बोपटे पुणे, रामदास भोसले पुणे, अरुण सारवान अकोला, दत्ता कदम लातूर, एकनाथ पाटील नांदेड, उत्तरेश्वर सपाटे, राम नेमते बीड, मनोज पतंगे नांदेड, अशोक भोसले सोलापूर आदींनी काम पाहिले. तुळजापूर शहरात या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला क्रीडाप्रेमी पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे दाद व प्रतिसाद मिळाला.
 
Top