तुळजापूर दि २ : डॉ. सतीश महामुनी


राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचारी संपावर गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने किराणा साहित्याचे किट भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तुळजापूर आगारात देण्यात आले. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले या मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्याचे किट वितरित करण्यात आले.


तुळजापूर आगारातील स्व. हनुमंत चंद्रकांत आकोसकर   यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व प्रमुख उपस्थितीतांनी श्रध्दांजली वाहिली, यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या १०० किराणा किटचे येथील गरजूंना वाटप करण्यात आल्या.


 यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, नगरसेवक विजय कंदले, औदुंबर कदम, किशोर साठे, विजय शिंगाडे,सुहास साळुंके, नरेश अमृतराव, राजेश शिंदे, प्रकाश मगर,विठ्ठल सोनवणे, तसेच युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले,राजेश्वर कदम, रोहित पाटील, इंद्रजित साळुंके, दिनेश बागल, बाळासाहेब भोसले, सचिन रसाळ, राम चोपदार, प्रसाद पानपुडे, सागर पारडे, निलेश नाईकवाडी,  गवळी,दयानंद शिंदे हे उपस्थित होते. 

एस टी कर्मचारी   नागनाथ मसुते, एन एस खांडेकर,सुरेंद्र सगरे, अमोल सरडे ,व्हि व्हि कांबळे,एस ए डोळस, राजा जाधव , किशोर पवार, अमित जाधव प्रमुखांनी किराणा किट वाटपासाठी नियोजन केले.
 
Top