वागदरी , दि. ०१ : एस.के.गायकवाड


शिवभक्तांच्या  दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जणारी  महाशिवरात्री निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.  भाविकांनी याप्रसंगी शिवलीलामृत या पवित्र ग्रथाचे सामुदायिकरित्या वाचन केले.
  

वागदरी ता.तुळजापूर येथे पुरातन काळातील फार जुने हेमाडपंथी महादेव मंदिर असून दर वर्षी येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविक ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही दि.१ मार्च  रोजी पहाटे पाच वाजल्या पासून महादेव मंदिरातील महादेवच्या पिंडीची विधीवत पुजा करून आभिषेकास सुरुवात केली होती. तर महादेव मंदिरात हरहर महादेवचा गजर करीत ग्रामस्थ ,महिला, युवक व युवती शिवभक्तांनी  कोरोनाचे निर्बंध पाळत मोठ्या संख्येने दर्शन घेतले. 
  

यानिमित्ताने येथील महादेव मंदिर सभागृहात ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या आधिपत्याखाली सामुदायिकरित्या शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले. यावेळी महाशिवरात्री एकादशी निमित्ताने प्रसाद म्हणून शाबूदाना खिचडीचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top