चिवरी , दि .२९ राजगुरू साखरे
अलीकडच्या काळात मुलांचे लग्न जमीवणे ही फार मोठी समस्या मुलांच्या पालकवर्गामध्ये निर्माण होऊन बसली आहे.लग्नाच्या बाबतीमध्ये मुलींच्या पालकवर्गामधुन मुलाबद्दलच्या अपेक्षा वाढले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा गत दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सिंचन क्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे बागायतदारांचे प्रमाणही वाढु लागले आहे , राहायला बंगला, चार चाकी गाडी, घरात एलईडी टीव्ही दारात बुलेट , अशा भावी सूनेसाठी सर्व तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला विवाहासाठी मात्र, मुलींकडून शेतकरी नवरा नको ग बाई अशा नवरी मुलीच्या भूमिकेमुळे नवरदेव नवरदेव राहण्याची भीती निर्माण झाली आहे .
सध्या नवरदेव होण्यासाठी इच्छुक असलेले तरुण नवरी शोधण्यासाठी गावोगावी फिरत आहेत, पाहुण्या- रावळात गेले तर मुलाला नोकरी पाहिजे पुण्या मुंबईत राहणारा पाहिजे, मुलीला देश-विदेशात फिरवणारा नवरा पाहिजे अशा फर्माईश मुलीकडून होऊ लागले आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात राबण्याची कोणत्याच मुलीची तयारी दिसत नाही, विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलीसुद्धा शेतकरी नवरा नको ग बाई असे म्हणत आहेत. मुलीचे अत्यल्प शिक्षण असले तरी प्रामुख्याने शासकिय नोकरी करणारा व शहरात राहणारा मुलगा पाहिजे.अशी अपेक्षा करणाऱ्या मुलींचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यामुळे विवाह जमविण्यास विलंब होत असुन विवाह जमण्यास विलंब झाल्यामुळे मुलांमध्ये नैराश्याची वातावरण निर्माण होऊ लागले आहे, त्याचबरोबर आजच्या काळामध्ये ३० ते ३२ वयापर्यंत तर मुलाचे स्थळ पाहण्यास जात आहे. अलिकाडच्या काळात नोकरी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.
उच्च शिक्षण घेऊनदेखिल मुलांना नोकरी मिळत नाहीत. असे चित्र दिसत आहे. , अलिकाडच्या काळामध्ये मुलींच्या आपल्या पतीबद्दलच्या अपेक्षादेखिल वाढल्या आहेत.अत्यल्प शिक्षण घेतलेली मुलगी देखिल आपणास मोठ्या पगाराची नोकरी करीत असलेला मुलगा पती म्हणुन मिळावा अशा अपेक्षा करू लागल्या आहेत .त्यातच मुलीच्या जन्मदर घटल्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी झाली असल्याने मुलांच्या लग्नाची ,समस्या आणखीन वाढल्या आहेत, एखाद्या व्यसयात स्थिर असलेला मुलगा चांगल्या प्रकारे पैसे मिळवत असला तरीदेखील अशा मुलाशी विवाह करण्यास मुलीची मानसिकता नसल्याचे अलीकडे दिसुन येत आहे.त्यामुळे अशा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहाविना राहण्याची वेळ आली आहे .
पूर्वीच्या काळी पालकवर्ग मुली लग्नाच्या वयात आल्या की त्यांच्या लग्नासाठी पायातील वहाना झिजेपर्यंत पळताना दिसतात. आता मात्र हे उलट होताना दिसून येत आहे असाच प्रयत्न मुलांच्या लग्नाच्या बाबतीत करतान दिसतो आहे..तसेच मुलांचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंत मुलांचे लग्नाचे वय वाढलेले असते व त्यामुळे त्याच्यां वयास अनुरुप अशा मुली मिळताना अडचणी येतात.मुलींच्या पालकांनादेखील सरकारी नोकरी करणारा मुलगाच मिळाला पाहिजे ही मानसिकता बाजुला ठेऊन उत्तम शेती अथवा उत्तम व्यापार करणाऱ्या मुलांस आपली मुलगी देणे गरजेचे आहे.
कधीकाळी आपल्याही मुलांच्या लग्नाच्यावेळी ही समस्या निर्माण होऊ शकते याचे भान ठेऊन मुलींच्या लग्नासाठी जी तत्परता दाखवली तर मुले आत्महत्या, व्यसनाधिनता ,नैराश्य अशा घटना निश्यचितपणे होणार नाहीत. त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर शेतकरी मुलंसुद्धा आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत " वावर हाय तर पावर हाय, असाच भाव कांद्याला मिळत गेला तर जीन्स वाल्या पोरी सुद्धा हेच म्हणतील शेतकरी नवरा हवा ग बाई , असे नवनवीन शेतीविषयक जनजागृतीचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसत आहेत.