तुळजापूर, दि .२९ :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ लातूरचे चेअरमन सुधाकर तेलंग यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील परीक्षा केंद्राला भेट दिली.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे दि . २९ मार्च रोजी दुसऱ्या सत्रा मध्ये संरक्षण शास्त्र या विषयाची परीक्षा सुरू असताना अचानकपणे मंडळाचे चेअरमन सुधाकर तेलंग यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. सुरु असलेल्या परीक्षा दालनांमध्ये त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर परीक्षा केंद्राच्या कामासंदर्भात अभिप्राय नोंदविला.
याप्रसंगी केंद्राची केंद्र संचालक प्रा. राजेंद्र खेदाड, सह केंद्रसंचालक प्रा. दत्तात्रय देवगुंडे, सह परिरक्षक ऋषिकांत भोसले, रनर प्रा. विवेकानंद कुंभार, परीक्षा कमिटीचे डॉ. सतीश महामुनी, प्रा. अमर भरगंडे, प्रा. अनंत माने, प्रा. गुलाब सय्यद, महादेव डुकरे, सुरेश मुळे आदी उपस्थित होते.
बारावी परीक्षेच्या अनुषंगाने सुधाकर तेलंग यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र या कामकाजाबद्दल त्यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.