पक्ष संघटन मजबूत करण्यासह महाविकास आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन


उस्मानाबाद , दि . २५ : 


आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान गतिमान झालेले आहे.  अभियानाअंतर्गत उस्मानाबाद शहरातील विविध प्रभागांमध्ये 13 ठिकाणी गुरुवारी (दि. )  शिवसैनिक आणि नागरिकांशी संपर्क साधून संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आलेले जनहिताचे निर्णय आणि योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याबरोबर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन अभियानात शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदिप निकम, शामराव पाचंगे यांनी केले.


उस्मानाबाद शहरातील प्रभाग एक मधील दत्त नगर, प्रभाग सातमधील तांबरी विभाग, प्रभाग आठमधील तांबरी विभाग, प्रभाग 16 मधील गणेश नगर, प्रभाग 17 मधील ख्वाजा नगर, प्रभाग नऊ मधील समता नगर,  प्रभाग  12 मधील निंबाळकर गल्ली,  प्रभाग दोनमधील विकास नगर, प्रभाग तीन बँक कॉलनी,  प्रभाग 19 शिवरत्न चौक, प्रभाग 13 भिम नगर या ठिकाणी शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली. अभियानादरम्यान शहरातील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर यांचे संपर्क कार्यालय तसेच माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांच्या कार्यालयास भेटी देऊन मान्यवरांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


या सर्व बैठकांना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शहरप्रमुख संजय मुंडे, गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक राजाभाऊ पवार, नगरसेवक सुरज साळुंके, नगरसेवक राणा बनसोडे, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, रवींद्र वाघमारे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, प्रवीण कोकाटे, रोहित निंबाळकर, दत्ता बंडगर, दीपक जाधव, पंकज पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर, अफरोज फिरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद, अजय नाईकवाडी, विनोद केजकर, रवी कोरे आळणीकर, अभीराज कदम, गणेश राजेनिंबाळकर, बंडु आदरकर, संकेत सुर्यवंशी, प्रविण केजकर, अजय धोंगडे, शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी, राम साळुंके, संदीप बनसोडे, निलेश साळुंके, दिनेश बंडगर, सत्यजित पडवळ, सॅडी गायकवाड, राम बनसोडे आदींसह शेकडो शिवसैनिक, महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top