तुळजापूर, दि.२५
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयाचे तिर्थ खुर्द ता. तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
दि.२५ मार्च ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी स्वयंसेवकांना आणि गावकऱ्यांना उद्देशुन राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय विकासात रासेयोची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर डॉ बालाजी गुंड यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही.एच.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, यावेळी कनिष्ठ विभागाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.वागदकर एस.पी,प्रा.वसावे एम.जी, तसेच डॉ.सी आर दापके, डॉ.एम.आर आडे,प्रा.बी.जे कुकडे, डॉ.ए.बी.गायकवाड,प्रा.के.एस.कदम,प्रा.एस.एम.कदम, डॉ.एफ.एम.तांबोळी,तर तिर्थ खुर्द येथील उपसरपंच रामदास पवार, महेश मोरे,मयुर जाधव, काशिनाथ दांगट, हनुमंत जाधव, बालाजी जमदाडे यांचे उत्तम सहकार्य लाभले. आभार प्रा.एस.सी.सुरवसे यांनी मानले,
.