वागदरी , दि . ०९
नळदुर्ग येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लिंबाजी कांबळे यांचे दि.८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते.
दिवंगत चंद्रकांत कांबळे यांनी तब्बल ३३
वर्षे पोलीस दलात सेवा बजावुन शेवटी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. नोकरी घरप्रपंच सांभाळत आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.ते आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद कांबळे यांंचे जेष्ठ बंधू होत. त्यांच्या पार्थिवावर दि.९ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान नळदुर्ग येथे बौद्ध धम्म संस्कारा नुसार अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले, एक मुलगी जावाई नातवंडे ,भाऊभावंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दु:खद निधना बद्दल रिपाइं सह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीलीआहे.