वागदरी , दि . ०९ : एस.के.गायकवाड:


जागतिक महिला दिनानिमित्त वागदरी ता.तुळजापूर येथे आम्रपाली युवती संघ व रमाई महिला मंडळ वागदरीच्या वतीने येथील  महिलांचा सत्कार करण्यात आला.
  

आम्रपाली युवती संघ व रमाई महिला मंडळ वागदरी ता.तुळजापूरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त येथील कर्तृत्वान महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील महिला उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अँड. अमोल पाटील आदी होते.
 

 प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, महात्मा फुले,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व  माता रमाई आंबेडकर  आदींच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवराच्या हस्ते पुजन करून एसटी बस वहाक म्हणून  यशस्वी पणे सेवा बजावत असलेल्या वंदना धुमाळ, ग्रा.प.सदस्या बकुलाबाई भोसले, विद्या बिराजदार, कमलबाई धुमाळ, अंगणवाडी सेविका पद्ममीनबाई पवार,मदतनीस रूपाली जाधव, लघु उद्योजक सिंधू  बिराजदार आदी कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.
  

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना अँड. अमोल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलानी प्रत्येक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन स्वकर्तुत्वाने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
  

 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी  तर प्रास्ताविक आम्रपाली युवती संघच्या स्नेहा झेंडारे यांनी केले व आभार ज्योती वाघमारे यांनी केले.याप्रसंगी महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top