जळकोट , दि . १०
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
हंगरगा नळ ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तर या योजनेतून सिमेंट रस्ता, पाणी पुरवठा पाईप लाईन, बंदिस्त गटार , अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य पती सरपंच अशोकराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोमवंशी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवशंकर वाघोले, बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश चौगुले, हंगरगा नळ सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, संजय वाघोले,,शरपोद्धीन पटेल, अमोल वाघोले, अहमद अली पटेल,माजी सरपंच मोहन कांबळे,ग्रा.प.सदस्य अंबादास घोडके,मुस्तापा पटेल,बाबु पटेल,अजगर पटेल, इस्माईल फकीर,जैनोदीन सय्यद,बाबु मासुलदार, नवनाथ कांबळे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.