वागदरी , दि . ११ :
नळदुर्ग येथे ७ वे बौद्ध साहित्य संमेलन रविवार दि . २० मार्च रोजी येथील बी.के.फंक्शन हाँल मध्ये होणार आहे.
नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे बौद्ध साहित्य परिषद आंबाजोगाई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष थोर साहित्यीक , उपराकार पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने असून उद्घाटक साहित्यिक तथा विद्दमान आमदार लहु कानडे (श्रीरामपूर) हे आहेत . तर परिसंवादाच्या सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे असून दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदनशिवे (कवठेमहांकाळ) यांच्या अध्यक्षतेखाली दुपार सत्रात कविसंमेलन होणार आहे.
या बौद्ध साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यीक ,कवि उपस्थित राहणार असून उदघाटन, परिसंवाद, कविसंमेलन व पुरस्कार वितरण , चार सत्रात एकदिवसीय हे बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून धनंजय शिंगाडे हे आहेत.
तरी जेष्ठ साहित्यीक, नवोदित साहित्यिक, कवी यांनी या साहित्य संमेलनात सहभागी होऊन हे साहित्य संमेलन यशस्वी करावे.असे अवाहन बौद्ध साहित्य परिषदेचे संस्थापक प्राचार्य कमलाकर कांबळे,संयोजक मारुती बनसोडे,भैरवनाथ कानडे , एस. के.गायकवाड बाबासाहेब बनसोडे, प्रमोद कांबळे,अरुण लोखंडे ,उमेश गायकवाड,आदीसह संयोजन समितीने केले आहे.