चिवरी , दि . ०९


 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि . ८ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रथमता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून    पुष्पहार अर्पण करण्यात आला.


 याचबरोबर शाळेमध्ये प्रश्नमंजुषा, भाषणाला आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेतील विद्यार्थिनीचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार  , म्हेञे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शत्रुघ्न बिराजदार, सहशिक्षक मोहन राजगुरू, अनिल मसलेकर, अण्णासाहेब भोंग, आदीसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी उपस्थित होत.
 
Top