तुळजापूर, दि.८ : 


महिलांसाठी समाजात सुरक्षीत वातावरण निर्माण होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी  डॉ.सई भोरे पाटील यानी केले.


 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व महिला सबलीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.सई भोरे पाटील,   यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  पुढे म्हणाल्या की, ज्ञान प्राप्तीसाठी म्हणुन मोठ्या विचारवंतांचे विचार ऐकणे किंवा अभ्यासने गैर नाही पण आपल्या अवतीभवती , आपल्या परिसरात देखील अशा घटना घडत असतात ज्या समाजासाठी हितावह नसतात, महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या बाबत असे निष्कर्ष आहेत की, संबंधित महिलांच्या जवळच्या व्यक्तीकडुनच अपराधी घटना घडलेल्या आहेत.समाजात अशीही उदाहरणे आहेत की,बऱ्याचदा पिडीत महिला पोलिस स्टेशनला येवु दिल्या जात नाहीत,आज महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देखील पुरेसे मिळालेले नाही, पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांपेक्षा जास्त कष्ट करून मिळवलेला पैसा खर्च करण्याचा अधिकार स्त्रीयांना प्राप्त होत नाही,स्त्रीया अविरत कष्ट करतात,त्यांना कधीही सुट्टी नाही, आयुष्यात कठीण परिक्षेला सामारे जाण्याची तयारी स्त्रीयांनी ठेवून त्यांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे, आपल्या कडे मातृसत्ताक कुटुंब पद्धततीने कांहीं परंपरा स्त्रीयांवर लादलेल्या आहेत,समाजात सत्य बोलणारा आणि निर क्षीर विवेक शाबूत असणारा व्यक्तीच आपला प्रभाव निर्माण करु शकतो असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.


अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की स्त्रीमुक्ती चळवळीतुन स्त्रीयांना आत्मसन्मान प्राप्त झाला,स्त्रीयांनी स्त्रीयांना सहकार्य करणे आवश्यक आहे ,पुरषांनी पुरुषी अहंकार व स्त्रीयांनी स्त्रीपणाच्या चौकटीतून बाहेर पडणे गरजेचे आहे म्हणजे माणूसपणाची निर्मती होईल, ग्रामीण भागातील मुलिंच्या शिक्षणाचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे,महिलांनी संघटीत होऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण विभागाच्या प्रमुख प्रा डॉ सी आर दापके यांनी केले तर पाहुण्यांची ओळख प्रा डॉ एफ एम तांबोळी यांनी करुन दिली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण देखील करण्यात आले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे,प्रा.आशपाक आतार, प्रा.वागदकर,प्रा.वसावे तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा ए बी वसेकर यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा व्ही एच चव्हाण यांनी तर आभार प्रा.कदम एस.एम यांनी मानले.सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
Top